मालदीव वि. लक्षद्विप

 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ जानेवारी २०२४ रोजी या बेटाला भेट दिली. या बेटाचे एक विकसित पर्यटन स्थळ करण्याच्या महत्वकांक्षेतुन रु. १२०० कोटी देण्याचे घोषित केले. अर्थातच मालदीवला याचा फटका बसणार म्हणून तेथिल तीन राजकीय नेत्यांनी गरळ ओकायला सुरुवात केली. मालदीवची पुर्ण अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. त्यात ३५ टक्के भारतीय, ३३ टक्के रशियन आणि ३२ टक्के चायनीज आहेत. मागील वर्षी २ लाखापेक्षा अधिक भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली. भारताचे पंतप्रधान यांच्याबद्दल गरळ ओकल्याने आतापर्यंत १००००/- पेक्षा जास्त पर्यटकांनी आपल्या नियोजित भेटी रद्द केल्यामुळे मालदीव सरकारला चांगलाच घाम फुटला, त्यामुळे तीनही मंत्र्यांचे निलंबन केले आहे.

लक्षद्वीप हा भारतातील आठ केंद्र शासित प्रदेशापैकी
सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ फक्त ३२ चौ.किमी. आहे. लक्षद्वीपची लोकसंख्या ६४,४२९ एवढी आहे. मल्याळी ही येथील प्रमुख भाषा आहे. लक्षद्वीपची साक्षरता ९२.२८ टक्के आहे, ही साक्षरतेच्या बाबतीत केरळानंतर भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
नारळ, लिंबू , चिंच, केळी ही येथील प्रमुख पिके आहेत.

कवरत्ती ही लक्षद्वीपची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. येथून जवळच असलेले मीनिकॉय बेट अतुलनीय निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. फॉस्फेट, कॅल्शियम, कार्बोनेट ही येथील प्रमुख खनिजे आहेत.

स्थानिक दंतकथांनुसार केरळचा अखेरचा राजा चेरमान पेरुमाल याच्या कारकिर्दीत या बेटांवरील पहिली वसाहत झाली असावी. काही अरब व्यापाऱ्यांच्या हुकुमावरून जेव्हा राजाला इस्लाम धर्म स्वीकारावयास लावण्यात आला, तेव्हा राजधानी क्रंगनोर (सांप्रतचे कोडुंगलूर)मधून त्याने मक्केला जाण्याच्या निमित्ताने पलायन केले. त्याच्या शोधार्थ किनाऱ्यावरील अनेक ठिकाणांवरून मक्केकडे जाणाऱ्या खलाशी बोटी सोडण्यात आल्या. त्यांपैकी कननोरच्या राजाची बोट तीव्र वादळात सापडून फुटली. तेव्हा अरबी समुद्रातच काही दिवस काढल्यानंतर शेवटी राजा व त्याच्याबरोबरील लोक एका बेटावर आले, ते बेट म्हणजेच ‘बंगारम बेट’ असल्याचे मानतात.

त्यानंतर ते जवळच्या अगत्ती बेटावर आले. शेवटी वातावरण निवळल्यानंतर वाटेतील वेगवेगळ्या बेटांवर थांबत थांबत ते मुख्य भूमीवर आले. हा राजा परतल्यावर खलाशी आणि सैनिकांची दुसरी तुकडी अरबी समुद्रात पाठविण्यात आली. तेव्हा त्यांनी अमिनी बेटाचा शोध लावून तेथे ते राहू लागले. या पथकामध्ये पाठविलेले लोक हिंदू होते. आज जरी या बेटांवर इस्लामचे प्रभुत्व स्पष्टपणे दिसत असले, तरी अजूनही हिंदूंच्या काही सामाजिक परंपरा या लोकांमध्ये पहावयास मिळतात. अमिनी, काव्हारट्टी, ॲन्ड्रोथ व काल्पेनी या बेटांवर प्रथम लहान लहान वसाहती स्थापन झाल्या व त्यानंतर या बेटांवरील लोकांनी अगत्ती, किल्टन, चेटलट व काडमट या बेटांवर स्थलांतर केले.

ओबेदुल्ला या अरबी फकिराने येथे इस्लामवर प्रवचने केल्याचे सांगितले जाते. ॲन्ड्रोथ बेटावर ओबेदुल्लाची कबर असून आज ते एक पवित्र स्थळ मानले जाते. श्रीलंका, मलेशिया आणि ब्रह्मदेशातही ॲन्ड्रोथच्या धर्मोपदेशकांचा आदर केला जातो. पोर्तुगीजांचे भारतात सोळाव्या शतकात आगमन झाल्यावर समुद्रपर्यटकांच्या दृष्टीने लखदीवला विशेष महत्त्व आले. जहाजांसाठी काथ्याच्या दोरखंडांना खूप मागणी होती, त्यासाठी बेटांवरील जहाजांची लूट करण्यास पोर्तुगीजांनी सुरुवात केली. नारळाचा काथ्या मिळविण्यासाठी पोर्तुगीज लोक काही वेळा जबरदस्तीने अमिनी बेटावर उतरत, परंतु बेटावरील लोकांनी या अतिक्रमण करणाऱ्या लोकांना विष घालून मारले. अशा रीतीने पोर्तुगीजांच्या अतिक्रमणाचा शेवट करण्यात आला.

लक्षद्वीप - चेटलँड बेट

सर्व बेटांवरील लोकांचे इस्लामीकरण केल्यानंतरही पुढे काही वर्षे चिरक्कलच्या (छिराकल) हिंदू राजाचेच अधिराज्य या बेटांवर होते. सोळाव्या शतकाच्या मध्यात चिरक्कलच्या राजाकडून कननोरच्या अरक्कल (अली राजा) या मुस्लिम घराण्यातील राजाच्या हातात बेटांची सत्ता आली. अरक्कलची कारकीर्द खूपच जुलमी व असह्य होती. तिला कंटाळून सन १७८३मध्ये अमिनी बेटावरील काही लोक मोठ्या धैर्याने मंगलोरला टिपू सुलतानकडे गेले व अमिनी गटातील बेटांची सत्ता स्वतःकडे घेण्याची विनंती त्यांनी टिपू सुलतानला केली. टिपू सुलतानने अरक्कलच्या पत्नीशी मैत्रीपूर्ण बोलणी केली, तेव्हा विचारविनिमय होऊन अमिनी गटातील बेटांची सत्ता टिपू सुलतानकडे देण्यात आली. अशा प्रकारे बेटांची विभागणी दोन अधिराज्यांत झाली. पाच बेटे टिपू सुलतानाच्या अधिसत्तेखाली आली व उरलेली तशीच अरक्कलच्या अधिसत्तेखाली राहिली. श्रीरंगपट्टणच्या युद्धात टिपू सुलतान मारला गेल्यानंतर बेटांचा ताबा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे आला. त्यावेळी बेटाचा राज्यकारभार मंगलोरहून चाले.

सन १८४७मध्ये एका तीव्र चक्रीवादळाचा तडाखा ॲन्ड्रोथ बेटाला बसला. तेव्हा चिरक्कलच्या राजाने बेटावरील लोकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी व त्यांना मदत देण्यासाठी ॲन्ड्रोथला जाण्याचे ठरविले. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी सर विल्यम रॉबिन्सन यानेही राजाबरोबर ॲन्ड्रोथला जाण्याचे ठरविले. ॲन्ड्रोथला गेल्यावर तेथील लोकांच्या सर्वच मागण्या पुरविणे राजाला अशक्य वाटले, तेव्हा विल्यमने कर्जाच्या स्वरूपात काही मदत राजाला देऊ केली. ही मदत पुढे चार वर्षेपर्यंत चालू ठेवली. कर्जाची रक्कम खूपच वाढली. इंग्रजांनी राजाकडे कर्ज परतफेडीची मागणी केली; परंतु परतफेड करणे राजाला अशक्य होते. तेव्हा १८५४मध्ये उरलेल्या सर्व बेटांचे प्रशासन ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात देण्यात आले. अशा प्रकारे सर्व बेटांवर ब्रिटिशांचे अधिराज्य आले. दोन लाख रुपयांच्या मोबदल्यात ही बेटे घेतली म्हणून त्यांचे नाव ‘लक्षद्वीप’ पडले असे म्हटले जाते.

लक्षद्वीप येथील प्रेक्षणीय स्थळे :

लक्षद्वीप बेटांचा नियोजित विकास झाल्यावर मालदीवला कटोरा घेऊन फिरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

पिंगळा महाद्वारीं बोली बोलतो देखा

*सहानुभूती एवढीच अपेक्षा