Posts

Showing posts from March, 2023

मुंगी उडाली आकाशी

  संत मुक्ताबाईंचा हा एक कुट अभंग आहे, त्यामुळे याचे निरूपण करणे तसे अवघड आहे. या अभंगातून त्या जे कधीच शक्य नाही ते पण शक्य होते, असा सांगायचा प्रयत्न तर करीत नाही ना …!, असा प्रश्न मनात उभा राहतो. मनुष्याच्या कल्पना शक्तीच्या किती तरी पलीकडे, मनुष्याच्या आभासी ज्ञानाच्या पलीकडे त्यांची अलभ्य विचार शक्ती आहे, हेच यातुन समजते. "मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला विंचू पाताळासी जाय शेष माथा वंदी पाय माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हासली... संत मुक्ताबाईचा या अभंगातून जे असंभवनीय ते संभवनीय झाले. अशक्य गोष्ट शक्य झालेली आहे, हे गुढ सांगत आहे. अशा आश्चर्य चकित करणाऱ्या घटना घडल्यामुळे त्यांना स्वतःला हसू येत आहे. 'देखोनी मुक्ताई हासली’ अशक्य कोटीतलं घडलंय जे विनोदी आहे, ते पाहून त्यांना हसू येतंय.या रचनेचे अनेक अर्थ लावले जाऊ शकतील. "ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या, अगा जे घडलेची नाही, तयाची वार्ता पुससी काई मिथ्या" - अस्तित्वात नसलेल्या मायेने (मुंगीने), सूर्याला (ब्रह्म जाणिवेला/ ज्ञानाला ) गिळून टाकले असं सांगायचं तर मुक्ताई प्रयत्न...

पिंगळा महाद्वारीं बोली बोलतो देखा

Image
   पिंगळा महाद्वारीं बोली बोलतो देखा । डौर फिरवितो डुगडुग ऐका ॥ध्रु०॥ वरल्या आळीला तुम्ही सावध रहावें । पाटीलबुवाला मग लावून सवें । चिठी येईल बा मग पडेल ठावें ॥ १ ॥" किर्र ऽऽ …रात्रींच्या वेगवेगळ्या प्रहरांवर गत पिढ्यांनी अनेक निशाचरांची नावे कोरली आहेत. त्यापैकी, सूर्य उदयाला येण्याअगोदर काही वेळाचा जो प्रहर असतो त्या वेळेचे पूर्वजांनी ‘पिंगळ वेळ’ असे नामकरण करून ठेवले आहे. या नावातही एक अनोखी गूढता दडलीये. ‘पिंगळ’ म्हणजे घुबड पक्षी अन् ‘पिंगळ वेळ’ म्हणजे त्याच्या ‘किजबिजण्याची वेळ… ’ नेमक्या याच प्रहराचे औचित्य साधत गावकुसाबाहेरील मसणवटीच्या परीघातून गावाच्या दिशेने दोन पावलं हळूहळू सरकू लागतात. भल्या पहाटेच्या नीरव शांततेतील निर्मनुष्य वाटांवर त्या पावलांना केवळ चामड्याच्या कुरकुरणाऱ्या चपलांच्या आवाजाची साथ असते. पहाटेच्या वेळी सावलीसारख्या दिसणाऱ्या त्या धिप्पाड सावळ्या देहाच्या कमरेवर शुभ्रसे एकटांगी धोतर, अंगातल्या आपऱ्या बंडीवर चढविलेले काळेभोर रूबाबदार जॅकेट, बगलेत टांगलेली झोळी, हाताच्या पंज्यात कौशल्याने पकडलेलं कुडमुडं किंवा गुडगुडी अन् पांढरपेशा भाषेत सांगायचं झाल...

यती किंवा हिम मानव

Image
   आज पण आधुनिक विज्ञानाला आश्चर्य चकीत करणारी हे जगातील एक सर्वांत गूढ रहस्य आहे. हिमालयात "यती किंवा हिम मानवाची पाऊल" उमटलेली सैनिकांना आढळली होती आणि तिला अधिकृत बातमी म्हणुन २०१८ मध्ये प्रसारीत केली होती. चित्रस्रोत :- गुगल अशीच धक्कादायक घटना रशियात उरल अशा अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या पर्वत रांगात घडली आहे, पण येथे "मानसी" नावाची एक आदिवासी जमात रहाते, त्यांनी दुसरे कोणी येऊ नये किंवा "नरभक्षक यती" किंवा "हिम मानव" यांनी काही पर्वतरोहींना मारून टाकले असावे अशी ही न उकलेली "गुढ रहस्यमय" विज्ञानाला चकवा देणारी अद्भुत घटना आहे. खरे तर "गोरा ओटोरटेन"( Gora Otorten) या हिमाच्छादित एक सरकणारे पर्वत आहे, आणि याचा अर्थ होतो "तेथे जाऊ नये", पण तरी ही मोहीम आखली गेली. युरी युदिन (Yuri Yudin) नावाचा पर्वत रोही आजारी पडल्याने तो "मानसी आदिवासी" वस्ती असलेल्या खेड्यातच थांबून गेला. २ फ़ेब्रुवारी १९५९ रोजी रशिया मधील उरल पर्वत रांगेतील एका खिंडीत यात असलेल्या सर्व पर्वतारोही यांचा अतिशय गूढ रित्या मृत्यू झाला आहे, ...