यती किंवा हिम मानव
आज पण आधुनिक विज्ञानाला आश्चर्य चकीत करणारी हे जगातील एक सर्वांत गूढ रहस्य आहे. हिमालयात "यती किंवा हिम मानवाची पाऊल" उमटलेली सैनिकांना आढळली होती आणि तिला अधिकृत बातमी म्हणुन २०१८ मध्ये प्रसारीत केली होती.
चित्रस्रोत :- गुगल
अशीच धक्कादायक घटना रशियात उरल अशा अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या पर्वत रांगात घडली आहे, पण येथे "मानसी" नावाची एक आदिवासी जमात रहाते, त्यांनी दुसरे कोणी येऊ नये किंवा "नरभक्षक यती" किंवा "हिम मानव" यांनी काही पर्वतरोहींना मारून टाकले असावे अशी ही न उकलेली "गुढ रहस्यमय" विज्ञानाला चकवा देणारी अद्भुत घटना आहे. खरे तर "गोरा ओटोरटेन"( Gora Otorten) या हिमाच्छादित एक सरकणारे पर्वत आहे, आणि याचा अर्थ होतो "तेथे जाऊ नये", पण तरी ही मोहीम आखली गेली. युरी युदिन (Yuri Yudin) नावाचा पर्वत रोही आजारी पडल्याने तो "मानसी आदिवासी" वस्ती असलेल्या खेड्यातच थांबून गेला.
२ फ़ेब्रुवारी १९५९ रोजी रशिया मधील उरल पर्वत रांगेतील एका खिंडीत यात असलेल्या सर्व पर्वतारोही यांचा अतिशय गूढ रित्या मृत्यू झाला आहे, ज्याचा शोध अगदी या क्षेत्रातील तज्ञ पण आजपर्यंत लावु शकले नाही.
रशिया सरकारने १९५९ सालच्या गुढ रहस्याचा पुन्हा हे नेमकं काय घडले म्हणून २०१९ ला तपास सुरू केला पण त्यात पण मृत्यु मुखी पडलेल्या ९ गिर्यारोहक यांच्या मृत्यूचे कारण न सापडल्याने २०२० मध्ये पुन्हा तपास बंद केला.
या घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर काही विश्वास न बसणाऱ्या पण अजूनही गुढ रहस्य म्हणून गणल्या गेलेल्या काही घटना समोर येतात.
तर नेमकं झाला काय .....
१. द्याटलोव नावाचा एक रशियन पर्वतारोही आपल्या इतर ९ साथिदारां बरोबर ओर्तोरेण / उरल ह्या पर्वताची सर करण्यासाठी बाहेर निघाला. सदर पर्वत हा कठीण वर्ग ३ मधील असल्याने चढण्यास सर्वांत मुश्किल होता पण सर्व १० लोक अतिशय अनुभवी पर्वतारोही होते, हे नमुद करणे गरजेच आहे. अगोदर सांगितल्या प्रमाणे यातील युरी युदिन (Yuri Yudin) आजारी असल्याने "मानसी" या आदिवासी वस्ती असलेल्या खेडेगावात थांबुन गेला होता.
चित्रस्रोत : museumcentre.org
२ नियमानुसार १२ फेब्रुवारी ला ते परत खाली पोचणार होते आणि न पोचल्यास इतर लोक त्यांचा शोध घेण्यास निघणार होते. १२ फेब्रुवारीची रात्र झाली पण कोणीच परत आले नाही आणि सर्वांनाच त्यांची चिंता जाणवू लागली होती. त्यांचा तळ मुख्य मोहिमेच्या ठिकाणापासून १३ की.मी. अंतरावर होता, असे ०२ फेब्रुवारीच्या फोटोवरून तपासात निष्पन्न झाले होते.
३. शेवटी २० फेब्रुवारी रोजी प्रशिक्षित गिर्यारोहक, डॉक्टर, शिक्षक, विद्यार्थी, यांचे तपास पथक, बेपत्ता झालेल्या द्याटलोव ( Dyatlov) सह इतर चमुला शोधण्यासाठी या अवघड उरल पर्वतांच्या खिंडीकडे निघाले. २६ फेब्रुवारी पर्यंत रशियन आर्मी , विमानदळ इत्यादी शोध कार्यांत सहभागी झाले. २६ फेब्रुवारी रोजी सर्व प्रथम तपास पथकातील मिखैल नावाच्या एका विद्यार्थ्याला द्याटलोव या टिम लिडरचा तंबू शोधून काढण्यात यश आले. तंबु हा मोठ्या आकाराचा होता, त्यामुळे सर्व पर्वतरोही याच तंबूत होते, असा एक प्रथम दर्शनी अंदाज बांधता आला.
आत मध्ये पाहिले तर सदर तंबूत बर्फ साचला होता, तंबू रिकामा असून आतमध्ये फक्त कपडे आणि बूट होते. तंबू आंतून फाडला गेला होता आणि त्याला खुप मोठे भोक पडले होते. सर्व चमू त्या भोकांतून पळून गेल्याची लक्षणे दिसत होती. विलक्षण गोष्ट म्हणजे त्यांचे सर्व समान आत होते. गरम कपडे, बूट इत्यादी. एकूण ८ ते ९ लोकांच्या पावूल खुणा लोकांना सापडल्या. कुणीही बूट घातले नव्हते. काही लोकांनी फक्त पायमोजे घातले होते तर काही जण फक्त एक बूट तर अनेक लोक चक्क अनवाणी पळले होते.
४. शोध कर्त्यांनी पाऊल खुणा चा पाठलाग करायला सुरवात केली. तंबू पासून जवळ म्हटली तरी सुमारे ५०० फुट अंतरावर एक खोल दरी होती. त्या दरीकडे सर्व लोक पळाले असण्याचा संभव होता. थोडे पुढे गेले तर एका केदार वृक्षाच्या खाली शोध कर्त्यांना पहिली दोन मृत शरीरे सापडली. त्या दोघांनी शेकोटी पेटविण्याचा प्रयत्न केला होता. दोघांच्या शरीरावर फक्त अंडरवेर होती आणि पायात मोजे सुद्धा नव्हते. केदार वृक्षाची एक फांदी मोडली होती, ज्यातून स्पष्ट होते दोघां पैकी एकाने वर चढून तंबू कडे पाहण्याचा पर्यंत केला होता, आणि त्याचे वजन सहन न झाल्याने केदार वृक्षाची फांदी मोडली आणि तो फांदीसह खाली पडला असावा, किंवा शेकोटी पेटविण्यासाठी फांद्या मोडून खाली टाकल्या असाव्या असा अंदाज शोध पथकाने बांधला. त्यांचे नाव होती क्रीवोनीशेंको (Krivonischenko) आणि डोरोशेंको ( Doroshenko)..!
चित्रस्रोत : http://museumcentre.org (फाटलेला तंबु)
५. तंबू आणि केदार वृक्ष ह्यांच्या मध्ये काही वेळाने अजुन ३ मृत शरीरे सापडली. येथे मात्र रहस्य असे की हे तिन्ही लोक तंबूच्या दिशेने पळून जाताना मृत्यू पावले होते हे एकंदरीत पाऊल खुणा आणि त्यांच्या प्रेतांची दिशा यावरून स्पष्ट होत होते. दुसरी अजून विचारात टाकणारी घटना म्हणजे तिन्ही शरीरे एक मेक पासून सुमारे २०० फुट अंतरावर सापडली होती. म्हणजे आता पर्यंत ५ लोक गुढ मृत्यू झाला हे जरी समजले, तरी तो का झाला, हे मात्र रहस्यच होते आणि शोध पथकासाठी आव्हान होते. यांची नावे होती टीम लीडर द्याटलोव (Dyatlov), स्लोबोडिन ( Slobodin) आणि महिला रोही कोलमो गोरोवा ( Kolmogorova) ..! स्लोबोडिनच्या डोक्याला फ्रॅक्चर होते, पण ते मृत्यूचे कारण नव्हते.
६. त्यानंतर इतर ४ मृतांचा पत्ता किंवा कोणताही मागमूस मिळत नव्हता. तपास पथक वेगवेगळे अंदाज बांधून सुरक्षितेची काळजी घेऊन ५९ दिवस तपास केला, पण हातात आशादायक असे काहीच मिळत नव्हते.
७. शेवटी ६० दिवशी बर्फ बराच वितळ्याने त्यांनी दरीकडे मोर्चा वळविला. शेवटी त्या केदार वृक्षा पासूनच सुमारे २५० फुटाच्या अंतरावर एका दरीत चार शरीरे सापडली. सुमारे १४ फूट खोल बर्फंत ते गाडून गेले होते. ४ जणांच्या शरीरावर जास्त प्रमाणात कपडे होते आणि जिवंत राहिलेल्यांनी मृत व्यक्तींचे कपडे आपल्या अंगावर घातले होते, अश्या खुणा दिसत होत्या.
तपासकार्य ....
८. मृत सापडल्यानंतर तपास काम सुरु झाले. सर्व लोक कडाक्याच्या थंडी मुळे मृत झाले असा प्रथम दर्शनी निष्कर्ष तपासी डॉक्टरनी काढला. त्यामध्ये एका व्यक्तीच्या डोक्यावर मात्र फ़्रेक्चर होते पण ते नक्कीच जीव घेणे नव्हते, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला.
९. तपास कार्य सुरूच होते. नंतर मे १९५९ या महिन्यात इतर ४ प्रेते सापडली. त्यामुळे तपासकार्याला गती प्राप्त होऊन निष्कर्ष काढता येईल, असे तपासपथकला वाटत होते. ही चार प्रेत काही फुट दरीत कोसळ्याचे आढळून आले.
१०. त्या ४ प्रेता मुळे मदत होण्याऐवजी तपासात गुंता तयार झाला. तपासाची दिशा बदलावी लागली. कारण होते पुन्हा एक गुढ रहस्य. या ४ ही मृत लोकांच्या डोक्यावर फार मोठी फ़्रेक्चर होती. डॉक्टरच्या म्हणण्या नुसार एका कार अपघाताप्रमाणे त्यांच्या डोक्यावर प्रहार झाला होता. यांची नाव होती थीबेक्झ ब्रिग्नोल्लेस (Thibeaux-Brignolles), महिलारोही दुबिनीना (Dubinina), झोलो तारवोव (Zolotaryov) आणि कोले वॅटोव (Kolevatov)..!
अजून विलक्षण गोष्ट म्हणजे दुबिनीना नावाची एक मुलगी होती. या मुली शिवाय इतर कुणाच्या ही शरीरावर दुसरे (कवटी सोडून ) कुठलेही फ्रेक्च्रर नव्हते. दुबीनाची जीभ, डोळे , खालचा ओंठ आणि कवटीचा एक भाग मात्र गायब होता, तिच्या बरगड्या फ्रॅक्चर झालेल्या होत्या. तारवोव (Zolotaryov) याच्या अंगात दुबिनीना (Dubinina) चा कोट आणि हॅट कशी आली हे पण एक नवीन रहस्य समोर आले. तर दुबिनीना (Dubinina) तिच्या पायावर क्रीवोनीशेंको (Krivonischenko) म्हणजे प्रथम जे दोघे मृत देह सापडले त्याची वूलन पॅन्ट गुंडाळलेली होती. तपास पथकाचे डोक्याच्या खोबरे करणारे हे गुढ रहस्य होते. त्यांच्याकडे असलेल्या कंदीलामध्ये किरण उत्सर्जन करणारे थोरियम होते.
११. तपास पथक आपले अंदाज बांधू लागले. त्या भागात कोणी अद्भुत प्राणी किंवा नरभक्षक आदि मानवा प्राण्यांचा वावर असावा. त्यानंतर तपासकर्त्यांनी अंदाज बांधला कि त्या भागांतील मानसी नावाच्या आदिवासी जमातीने कदाचित त्यांना मारले असावे पण, कुठेही हातापायी झाल्याची खून नसल्याने तो अंदाज बाजूला ठेवला. एका व्यक्तीने हे काम रशियन यति चे असल्याचा सिद्धांत मांडला. रशियन येती ची दंत कथा प्रसिद्ध असून येती जीभ काढून खातो अशी समजून होती.
किंवा हा अपघात सुरक्षेच्या दृष्टीने रशिअन आर्मी ने घडवून आणला असावा किंवा या निर्मनुष्य भागात रशियन आर्मी त्या वेळी काहीतरी खास हत्याराची चाचणी घेत असावी आणि या पर्वतरोहींचा मृत्यू त्यांत चुकून झाला असावा. तपासपथकाने २-३ की.मी. च्या रहिवाशा कडुन काही माहिती मिळते का म्हणून प्रयत्न केले तर लोकांनी त्या रात्री आकाशांत एक विशिष्ट प्रकारचा प्रकाश पहिला होता, अशी एक घटना उघडकीस आली.
१२. सर्वांत योग्य स्पष्टीकरण असे होते कि रात्री कपडे काढून झोपल्या नंतर अचानक, अनपेक्षित रात्री एखादा हिमवादळाचा लहान - मोठा झटका आला असावा. सर्व कपडे काढून झोपले म्हणजे त्यांना हिमवादळाची थोडी पण शक्यता नव्हती असा कयास असावा. मानसिक तयारी नसल्याने घाबरून सर्वांनी बचावा करीता पळ काढला असावा. पळता पळता ४ लोक दरीत पडले असावे. इतर ५ लोक वाचले पण परत अंधारांत तंबू शोधत शोधत थंडीने त्यांचा मृत्यू झाला असावा.
१३. आज पर्यंत ह्या घटनेवर १५ पेक्षा जास्त चित्रपट किंवा टीवी भाग प्रदर्शित झाले आहेत आणि किमान ३ महत्वाची पुस्तके लिहिली गेली आहते. द्याटलोव संग्रहालय ह्या घटने नंतर उभे राहिले आणि तेथे सर्व ९ पर्वतारोहींचे समान जपून ठेवले गेले आहे.
१४. आज ही गूढ रहस्य म्हणून राहिलेली घटना आता द्याटलोव खिंड (The Dyatlov Pass) घटना म्हणून प्रसिद्धीस आली आहे.
स्रोत
'Dyatlov Pass incident - Wikipedia:
'Devil's Pass - Wikipedia'
Comments
Post a Comment