- Get link
- X
- Other Apps
Posts
*सहानुभूती एवढीच अपेक्षा
- Get link
- X
- Other Apps
. ह्या पोरी कधीतरी नवीन नवरी म्हणून गावात आल्या असतील. नवीन नवीन सासरी आल्यावर माहेरची ओढ असेल, “ह्या गावात करमतच नाही बया” असं कधी उघड एखाद्या मैत्रिणी जवळ म्हणत असतील किंवा मनातल्या मनात म्हणत असतील. . एखाद लेकरू बाळ झाल्यावर कौतुकाने माहेरी गेल्या असतील. दिवस सरत गेल्यावर हळू हळू समजलं असेल की ज्याला आपण आपलं गाव समजत होतो ते आता पाव्हण्याचे गाव झालं आहे आणि ज्या गावात नवीन नवीन आपल्याला करमत नव्हतं तेच आता आपलं गाव आहे. . बाई माणसाला किती बदलावं लागतं ह्या जगात. मामाच्या गावाला जाणारी लेकरं हळू हळू कमी होत बंद झाल्यावर समजून येतं की आपले आई बाप गेले आणि लेकरांच्या मामाचं गाव पण तुटलं. . आता राहिलं ,हे “आपलं गाव “ जे गाव लग्न होईपर्यंत आपल्याला माहीत सुद्धा नव्हतं ते गाव आपलं होऊन जातं. . ह्या म्हाताऱ्यांचं सरपण नदीला गेलंय पण ह्या अजून खंबीरपणे गावातच आहेत. नदीला आणि सरपणाला चकमा देत. नातीचं लगीन बघणार, नातवाचं लगीन बघणार. . परवा गावी गेल्यावर गल्लीतील एका लग्नात एका म्हातारीला खांद्यावर उचलून लग्न मंडपात आणलं होतं. म्हातारीच्या डोळ्यात पाणी मायना. काही लोक म्हणतात लग्न सरकारी...
*मोसाद - असं कसं झालं - मागोवा*
- Get link
- X
- Other Apps
. लेखक : मिलिंद घारपुरे . तारीख.... 17 सप्टेंबर 2024... वेळ...... दुपारचे 3 वाजून 23 मिनिट.... स्थळ.... लेबनोन मधील.... रस्ते घरे.... अनेक अनेक ठिकाणे..... मोसाद.....ला का एव्हढे भयंकर समजतात ते पुन्हा एकदा साऱ्या साऱ्या जगाने अनुभवले.... एकाच वेळी तब्बल 5000 पेजर चा स्फोट झाला आणि सारे जग हादरले.... हिजबुल्ला आणि हमास चे 5000 सैनिक .... स्फोटात... जखमी अथवा काही ठार देखील झाले आधीतर कोणालाच थांगपत्ता लागला नाही कि नेमके झाले तरी काय... मोसाद ने असें काही घडवता येऊ शकते.... ही कल्पना देखील अनेकांच्या..... ह्या सगळ्यांची सुरुवात झाली... डिसेंबर च्या दुसऱ्या आठवड्यात... लेबनोन मध्ये.... इस्त्राएल ला आपल्या मोबाईल नेटवर्क मुळे आपल्या सैनिकांचा मागोवा घेता येतो आणि अचूक हल्ले करून त्यांचा नाश करता येतो... असें हिजबुल्ला आणि हमास च्या कमांडर्स ना जाणवले... मग आता त्याच्यावर उपाय काय... तर सगळ्यांना मोबाईल फोन चा वापर टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या. आत्ता याला पर्याय काय... जो अगदी सुरक्षित असेल तर... पेजर.... ज्याला बाहेर कुठूनच काहीच नेटवर्किंग नसते अल्फा नुमेरिक पेजर ज्याचे लोकल मे...
मालदीव वि. लक्षद्विप
- Get link
- X
- Other Apps
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ जानेवारी २०२४ रोजी या बेटाला भेट दिली. या बेटाचे एक विकसित पर्यटन स्थळ करण्याच्या महत्वकांक्षेतुन रु. १२०० कोटी देण्याचे घोषित केले. अर्थातच मालदीवला याचा फटका बसणार म्हणून तेथिल तीन राजकीय नेत्यांनी गरळ ओकायला सुरुवात केली. मालदीवची पुर्ण अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. त्यात ३५ टक्के भारतीय, ३३ टक्के रशियन आणि ३२ टक्के चायनीज आहेत. मागील वर्षी २ लाखापेक्षा अधिक भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली. भारताचे पंतप्रधान यांच्याबद्दल गरळ ओकल्याने आतापर्यंत १००००/- पेक्षा जास्त पर्यटकांनी आपल्या नियोजित भेटी रद्द केल्यामुळे मालदीव सरकारला चांगलाच घाम फुटला, त्यामुळे तीनही मंत्र्यांचे निलंबन केले आहे. लक्षद्वीप हा भारतातील आठ केंद्र शासित प्रदेशापैकी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ फक्त ३२ चौ.किमी. आहे. लक्षद्वीपची लोकसंख्या ६४,४२९ एवढी आहे. मल्याळी ही येथील प्रमुख भाषा आहे. लक्षद्वीपची साक्षरता ९२.२८ टक्के आहे, ही साक्षरतेच्या बाबतीत केरळानंतर भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे. नारळ, लिंबू , चिंच, केळी ही येथील प्रमुख पिके आ...