*मोसाद - असं कसं झालं - मागोवा*

 .

लेखक : मिलिंद घारपुरे

.

तारीख.... 17 सप्टेंबर 2024...

वेळ...... दुपारचे 3 वाजून 23 मिनिट....

स्थळ.... लेबनोन मधील.... रस्ते घरे.... अनेक अनेक ठिकाणे.....

मोसाद.....ला

का एव्हढे भयंकर समजतात ते पुन्हा एकदा साऱ्या साऱ्या जगाने अनुभवले....

एकाच वेळी तब्बल 5000 पेजर चा स्फोट झाला आणि सारे जग हादरले....

हिजबुल्ला आणि हमास चे 5000 सैनिक .... स्फोटात...

जखमी अथवा काही ठार देखील झाले

आधीतर कोणालाच थांगपत्ता लागला नाही कि नेमके झाले तरी काय...

मोसाद ने असें काही घडवता येऊ शकते.... ही कल्पना देखील अनेकांच्या.....

ह्या सगळ्यांची सुरुवात झाली...

डिसेंबर च्या दुसऱ्या आठवड्यात... लेबनोन मध्ये....

इस्त्राएल ला आपल्या मोबाईल नेटवर्क मुळे आपल्या सैनिकांचा मागोवा घेता येतो आणि अचूक हल्ले करून त्यांचा नाश करता येतो... असें हिजबुल्ला आणि हमास च्या कमांडर्स ना जाणवले...

मग आता त्याच्यावर उपाय काय... तर सगळ्यांना मोबाईल फोन चा वापर टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आत्ता याला पर्याय काय... जो अगदी सुरक्षित असेल तर...

पेजर.... ज्याला बाहेर कुठूनच काहीच नेटवर्किंग नसते

अल्फा नुमेरिक पेजर ज्याचे लोकल मेसेज घ्यायचे काम असते ते अगदी safe असते त्यावर दुसरे कुठलेच उपकरण जोडल्या जात नाही हे अगदी साधे सोप्पे फक्त संदेश देवाण घेवाण चे काम करणारे सुरक्षित उपकरण...

ह्याचाच आता वापर करायचा असें ठरले...

मोसाद ला ह्याची कुणकुण लागली....

इतके पेजर.... म्हणजे कोणाला युरोप मध्ये ऑर्डर मिळणार...

मोसाद चे एजन्ट कामाला लागले....

थोड्या च दिवसात एक बातमी घेऊन एक एजन्ट आला...

तैवान स्तित....

गोल्डन अपोलो या कंपनी ला

युरोप मधील Novek कंपनी कडून 5000 पेजर ची लेबनान मधील ऑर्डर मिळाली...

आता मोसाद चे तिन्ही शाखा...

अमान..... मिलिटरी इंटेलिजन्स...

शिनबेत.... लोकल इंटेलिजन्स.... आणि खुद्द मोसाद.... एकत्र आल्या...

आणि न भूतो ना भविष्याती...

अशा या ऑपेरेशन जेरिको...

ला सुरुवात झाली...

याहूदी म्हणजे jew.... यांचे आपल्या राष्ट्र इस्राएल यावर अवीट प्रेम आणि कडवी निष्ठा...

ऑपेरेशन मध्ये जगाच्या पाठीवर कुठेही असलेला याहूदी हा त्या एजन्ट ला सगळी सगळी गुप्त रूपात मदत करतोच करतोय

त्याला दायान असें म्हणतात...

हा दायान त्या एजन्ट ला लपवतो त्यांना हवे त्या शस्त्र दारुगोला पैसे गाड्या इतर वाहने यांचा पुरवठा स्वतः अजिबात नजरेत न येता करतो...

आता मोसाद ने आपले पुढचे target म्हणजे त्या कंपनी त प्रवेश...

मोसाद चे काही तज्ज्ञ इंजिनीर्स या कंपनीत घुसवले गेले ती कहाणी पण खूप चित्त चक्षु चमत्कारीक आहें...

पण त्याविषयी नंतर...

आत्ता पुढील लक्ष्य ते 5000 पेजर हस्तगत करून त्यात PETN.... पेंटा एरिथ्रीटोल.. तेत्रा नित्रीटे....

Penta erithritol tetra nitrite.... हे कार्बन नीट्रॉजन आणि hydrogen यांचे स्फोट घडवून हे वेगळे करणारे स्फोटक.... त्या 5000 पेजर मध्ये बेमालूम पणे बसवले गेले... त्यात एक कोड टाकल्या गेला त्यामुळे झाले काय कि... फक्त त्या आणि त्या मेसेज वर च त्या पेजर चा स्फोट होईल....

इतर मेसेज सुरळीत जातील...

त्यामुळे कोणालाच जरा पण संशय येणार नाही.

AR... 924.....या सिरीयल चे हे 5000 पेजर तैवान च्या गोल्ड अपोलो कंपनी तुन युरोप येथील

कंपनी त सुखरूप पोहोचले

मोसाद अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष्य ठेवून होती

आत्ता युरोप मधून ते हंगेरी मधील बुडापेस्ट येथे पोहोचले

तेथून विमानाने ते लेबनोन येथे...

हे सगळे व्हायला जानेवारी चा तिसरा आठवडा उजाडला....

नंतर फेब्रुवारी च्या दुसऱ्या आठवड्यात हे पेजर हळूहळू वाटल्या जायला सुरुवात झाली...

एखाद्या दबा धरून बसलेल्या आणि भक्षाची वाट पाहणाऱ्या अजगरा सारखी मोसाद आता वाट बघत होती

आत्ता त्यांना घाई न्हवती...

अचानक हमास च्या एका कमांडर ला पेजर चा संशय आला...

त्याचा पेजर फारच लवकर गरम व्हायचा...

Charging करताना...

मोसाद ची टीम कामाला लागली

एके दिवशी सकाळी....

बाहेर निघताना त्या कमांडर चा accident झाला त्यात तो...

मोसाद चा जीव भांड्यात पडला...

आत्ता फक्त वाट बघणे....

महिन्या मागून महिने गेले

हळू हळू ते 5000 पेजर्स सगळ्यांना वाटून झाले....

मेसेज ची देवाण घेवाण सुरु झाली...

अश्यात....

तारीख उजाडली 17 september 2024

साधारण असें मोसाद ला आढळून आले

दुपारी 3 ते 4 याच वेळात सगळ्यात जास्त मेसेज ची देवाण घेवान होते...

इतके महिने ज्याची वाट बघितली तो दिवस आला....

लेबनोन मधील एक स्टेशन हॅक केले गेले...

त्यावरून एकाच वेळी तो संदेश सहक्षेपीत केला.....

जसा तो मेसेज पोहोचला...

एकाच वेळेस...

बूम्म.....

5000 पेजर चा स्फोट झाला...

किती मेले कितीक जखमी झाले...

दुसऱ्या महा युद्धनंतर आजवर झालेला हा सगळ्यात मोठ्ठा हल्ला होता...

यामुळे झाले काय तर....

हिसबुल्लाह आणि हमास पूर्णपणे हादरून गेले

असा दूर नियंत्रित हल्ला कुठूनही करता येत असेल

तर....

कुठलीच गोष्ट सुरक्षित नाही...

आता त्यांना प्रचंड भीती बसली

साधा फोन... घ्यायला पण

त्यानंतर असेच  सोलर पॅनल आणि walkie talkie त ब्लास्ट घडवून आणले गेले...

आता सारे जग इतके हादरून गेले आहें कि....

मोसाद ने या युद्धात आज मानसिक दृष्ट्या अभूतपूर्व असा विजय मिळावीला आहें...

या विजयाची तुलना करायची तर

बाजीराव ने अगदी थोड्या सैन्यनिशी पालखेड येथे निजामच्या मोठ्या सैन्याला पाणी पाजले...

याच्याशी करता येईल...

धन्य ती मोसाद... आणि

धन्य ते अगदी टिचभर राष्ट्र...

इस्त्राएल....

Comments