'लग्नाची गूढ रात्र'
या पृथ्वीतलावरा विज्ञानाचा कितीही गाजावाजा केला तरी सर्वच काही माणुसकीने चालले आहे, असे म्हणता येत नाही. काही देशामध्ये आज पण स्त्रीला एक उपभोगाची वस्तु म्हणून पाहिले जाते, हे वाचुन आश्चर्यकारक वाटून घेऊ नका. लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीनंतर सकाळी सगळ्यांना बेडशीट दाखवण्यात येण्याची अझरबायजानच्या ग्रामीण भागात ही प्रथा आहे. याची माहिती देत आहे, शाखला इस्माईल, ज्या स्त्री हक्काच्या अभ्यासक आहेत. चित्रस्रोत : bbc.com बेडशीटवरच रक्त हे विवाहितांच्या नातेवाईकांसाठी लग्न सफल झाल्याचा पुरावा असतं. रक्ताचे डाग पाहिल्यावर कुटुंबाकडून नवदांपत्याचं अभिनंदन करण्यात येतं आणि यानंतरच लग्नाचे विधी पूर्ण झाल्याचं मानण्यात येतं. ''म्हणूनच लग्नाच्या रात्रीभोवती एक गूढ वलय नेहमीच असतं...सकाळी बेडशीट्सवर काय दिसणार?'' अझरबायजानमध्ये स्त्रीहक्कांचा अभ्यास करणाऱ्या शाखला इस्माईल सांगतात. बेडशीटवर रक्ताचे डाग नसतील तर त्या महिलेला वाळीत टाकण्यात येतं. आणि ती 'सदोष' असल्याचं सांगत तिच्या आईवडिलांकडे परत पाठवण्यात येतं. यानंतर ती घटस्फोटित असल्याचं मानलं जातं आणि पुन्हा लग्न करणं हे ...