*सुगौलीचा करार*

 

हा एक महत्वाचा करार असला तरी, त्याबद्दल जास्त नागरिकांना माहिती नाही. इतिहासाची पाने दोनशे वर्षे मागे उलटून पाहिली असता एक विशेष करार (तह) झाल्याचे दिसते.

आपण फक्त भारत - पाकिस्तान फाळणी मुळे पंजाब आणि बंगाल यांना चटके बसले असे समजतो. त्यापूर्वीच "सुगौली करार" याने मिथीला / अवध यांना पण सीमावादाचे कष्ट झेलावे लागले. घाव ते शेवटी घावच असतात, ती जखम भरली तरी व्रण आज पण दिसत आहे.

छायाचित्र : गुगल - सुगौली करारांतर्गत ब्रिटिशांना परत केलेला भु-भाग

या विषयाकडे लक्ष वेधायचे मुख्य कारण आतापर्यंत दुर्लक्षित आणि दुर्गम भागात कोणाचे लक्ष पण जात नव्हते, पण आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या भागात भारत सरकारने सीमे लगत एक नवीन रस्त्याचे बांधकाम केले. हा रस्ता म्हणजे भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर परंतु भारतात असलेल्या कालापाणी ते लिपुलेख पर्यंत तयार केलेला रस्ता !

नेपाळ सरकारला हे पण माहिती नाही की, आपण एके काळी संस्थानिका जिंकलेला भु-भाग "सुगौली करार" करून इंग्रजांच्या ताब्यात दिला, म्हणजे तो भारताचा भु-भाग झाला.

इ.स. १८०६ सालची ही घटना आहे.

भीमसेन थापा नेपाळचे सर्वेसर्वा तर गिर्वाणयुद्ध विक्रम शहा त्यावेळी राजे होते. त्यांचे वय ९ वर्षे असावे. अवघे दोन वर्षे वय असतांना इ.स. १७९९ मध्ये त्यांना नेपाळच्या राजगादी वर बसविले होते. ते अल्पवयीन असल्याने कारभार भीमसेन थापा चालवायचे. नंतर ते पंतप्रधान झाले. तेव्हा भारत विविध संस्थानांत विभागलेला होता. याचा फायदा घेत थापाने एकापाठोपाठ एक आक्रमण करीत आजचे हिमाचल आणि उत्तराखंडचा मोठा भाग जिंकला. कांगडा किल्ल्यापर्यंत नेपाळचे राज्य पसरले होते. गोरखांच्या बहादुरीपुढे भारतीय संस्थानिकांची फौज तग धरूशकली नाही. एवढेच नव्हे, तर सिक्कीमचा मोठा भागही नेपाळच्या कब्जात गेला.

अवध संस्थाने भीमसेन थापाची युद्धनीती बघुन इंग्रजांचा आश्रय घेतला. अवध संस्थानचा आणि नेपाळचा सीमावाद अगदी युद्धाला तोंड फुटले अशा परिस्थितीत येऊन ठेपला होता. अशा वेळेस इंग्रजांना आपली ताकद दाखविण्याची नामी संधी चालून आली.

छायाचित्र : गुगल - ईस्ट इंडिया कंपनी मुख्यालय

त्यातूनच १ नोव्हेंबर १८१४ रोजी नेपाळ आणि ब्रिटिशांदरम्यान युद्ध सुरू झाले. १८१५ उजाडेपर्यंत गोरखा सैनिक पराभवाच्या उंबरठ्यावर आले. त्यामुळे शेवटी २ डिसेंबर १८१५ रोजी नेपाळ सरकारने इंग्रजाबरोबर तह करण्याचे मान्य केले.


४ मार्च १८१६ ला दोन्ही बाजूंनी अधिकृतपणे सुगौली गावात तह (करार) झाला, तीच युद्धसमाप्तीची तारीख मानतात. नेपाळतर्फे राजगुरू गजराज मिश्र आणि ईस्ट इंडिया कंपनीतर्फे लेफ्ट. कर्नल ब्रॅडशॉ यांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानंतर नेपाळला २५ वर्षांत जिंकलेला भाग ईस्ट इंडिया कंपनीला परत द्यावा लागला. या कराराचा महत्वाचा भाग म्हणजे नेपाळी / गोरखा यांना ब्रिटिश सैन्यात भर्ती केले जाईल असा एक मुद्दा होता.

सुगौली करार मुळे गोरखा बहादूर असल्याने त्यांना ब्रिटिश लष्करात प्रवेश करण्याची संधी मिळाली. हा एक नवा अध्याय सुरू झाला.

त्यानुसार गोरख्यांचे शौर्य पाहून ब्रिटिशांनी त्यांना आपल्या सैन्यात भर्ती करण्यास सुरुवात केली. १८५७ मध्ये ब्रिटिशांविरुद्ध क्रांती झाली, तेव्हा ही क्रांती दडपण्यासाठी गोरख्यांनी मोठी भूमिका बजावली होती. यावर खुश होत, इंग्रजांनी नेपाळला तराई म्हणजे अवध / मिथिलाचा काही भाग परत केला.

पर्वतीय क्षेत्र आणि दुर्गम भाग असल्याने मोघम सीमामुळे नेपाळकडून संभ्रम निर्माण केला जातो. ज्या रस्त्यावरून वाद आहे, तो भाग भारताचा आहे. यामध्ये कालापाणी क्षेत्रातून वाहणारी महाकाली नदीला भारत-नेपाळ सीमा मानले गेले. मात्र सर्वक्षण करणाऱ्या ब्रिटिश आधिकाऱ्याने नंतर नदीचे उगम स्थान देखील चिन्हित केले. ज्यातील अनेक ठिकाणी सहाय्यक नद्या देखील मिळतात. नेपाळचा दावा आहे की, पश्चिम क्षेत्रातून वाहणारी जलधाराच वास्तविक नदी आहे. तर भारत नदीचे उगम स्थळ दुसरे सांगत त्या ठिकाणावर आपला दावा करत आहे.

१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला;

परंतु सुगौली करार कायम राहिला.

स्रोत :-

eknathjune61.blogspot.com

'www.roadmedia.com'

सुगौली संधि और नेपाल-भारत के बीच बंटवारे की गाथा


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पिंगळा महाद्वारीं बोली बोलतो देखा

*सहानुभूती एवढीच अपेक्षा