Posts

Showing posts from April, 2023

'लग्नाची गूढ रात्र'

Image
  या पृथ्वीतलावरा विज्ञानाचा कितीही गाजावाजा केला तरी सर्वच काही माणुसकीने चालले आहे, असे म्हणता येत नाही. काही देशामध्ये आज पण स्त्रीला एक उपभोगाची वस्तु म्हणून पाहिले जाते, हे वाचुन आश्चर्यकारक वाटून घेऊ नका. लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीनंतर सकाळी सगळ्यांना बेडशीट दाखवण्यात येण्याची अझरबायजानच्या ग्रामीण भागात ही प्रथा आहे. याची माहिती देत आहे, शाखला इस्माईल, ज्या स्त्री हक्काच्या अभ्यासक आहेत. चित्रस्रोत : bbc.com बेडशीटवरच रक्त हे विवाहितांच्या नातेवाईकांसाठी लग्न सफल झाल्याचा पुरावा असतं. रक्ताचे डाग पाहिल्यावर कुटुंबाकडून नवदांपत्याचं अभिनंदन करण्यात येतं आणि यानंतरच लग्नाचे विधी पूर्ण झाल्याचं मानण्यात येतं. ''म्हणूनच लग्नाच्या रात्रीभोवती एक गूढ वलय नेहमीच असतं...सकाळी बेडशीट्सवर काय दिसणार?'' अझरबायजानमध्ये स्त्रीहक्कांचा अभ्यास करणाऱ्या शाखला इस्माईल सांगतात. बेडशीटवर रक्ताचे डाग नसतील तर त्या महिलेला वाळीत टाकण्यात येतं. आणि ती 'सदोष' असल्याचं सांगत तिच्या आईवडिलांकडे परत पाठवण्यात येतं. यानंतर ती घटस्फोटित असल्याचं मानलं जातं आणि पुन्हा लग्न करणं हे ...

इतिहासातील रहस्यमय मृत्यु

Image
  "आधुनिक राजकीय इतिहासकार मॅकावली यांनी बहुतेक बाबर यांच्याबद्दल जास्त ऐकलं नसेल. जर त्यांनी ऐकलं असतं तर 'द प्रिंस' हे पुस्तक लिहिण्याऐवजी त्यांनी बाबर यांच्या आयुष्यावर आधारित एखादं पुस्तक नक्की लिहिलं असतं. हे पुस्तक लिहिण्यात त्यांनी जास्त रस दाखवला असता." "असं इंग्रजीतील प्रसिद्ध कादंबरीकार ई. एम. फॉस्टर यांचं हे वाक्य आहे". बाबर हे केवळ यशस्वी राज्यकर्तेच नव्हते. तर सौंदर्यबोध आणि कलात्मक गुणही त्यांच्यामध्ये होते. इतिहासातील गूढ मृत्यू बाबत आजही तेवढ्याच रसिकतेने चर्चा होताना आपण पाहतो, तेव्हा बाबर हे सुध्दा एक त्या चर्चेच पात्र आहे. तेव्हा झालेले हे मृत्यू नैसर्गिक होते की अनैसर्गिक, कि सत्ता लालसेतून झालेले खून तर नव्हते ना असा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये कधी ना कधीतरी डोकावून गेलेलाच असतो. पण इतिहासातील अशा गूढ मृत्यूंची उकल होणे कठीणच असते, त्याचे कारणही तसेच आहे. सध्याच्या युगातील बौद्धिक विचारातून या मृत्यूबद्दल ठेवले जाणारे तर्कवितर्क तंतोतंत योग्यच असतील असे नाही. परिस्थितींमुळे आपणही अनेक विचार क्षणाक्षणाला बदलत असतो. मग अशावेळी ५०० ते ६०० ...

*सुगौलीचा करार*

Image
  हा एक महत्वाचा करार असला तरी, त्याबद्दल जास्त नागरिकांना माहिती नाही. इतिहासाची पाने दोनशे वर्षे मागे उलटून पाहिली असता एक विशेष करार (तह) झाल्याचे दिसते. आपण फक्त भारत - पाकिस्तान फाळणी मुळे पंजाब आणि बंगाल यांना चटके बसले असे समजतो. त्यापूर्वीच "सुगौली करार" याने मिथीला / अवध यांना पण सीमावादाचे कष्ट झेलावे लागले. घाव ते शेवटी घावच असतात, ती जखम भरली तरी व्रण आज पण दिसत आहे. छायाचित्र : गुगल - सुगौली करारांतर्गत ब्रिटिशांना परत केलेला भु-भाग या विषयाकडे लक्ष वेधायचे मुख्य कारण आतापर्यंत दुर्लक्षित आणि दुर्गम भागात कोणाचे लक्ष पण जात नव्हते, पण आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या भागात भारत सरकारने सीमे लगत एक नवीन रस्त्याचे बांधकाम केले. हा रस्ता म्हणजे भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर परंतु भारतात असलेल्या कालापाणी ते लिपुलेख पर्यंत तयार केलेला रस्ता ! नेपाळ सरकारला हे पण माहिती नाही की, आपण एके काळी संस्थानिका जिंकलेला भु-भाग "सुगौली करार" करून इंग्रजांच्या ताब्यात दिला, म्हणजे तो भारताचा भु-भाग झाला. इ.स. १८०६ सालची ही घटना आहे. भीमसेन थापा...