*गीत महाभारत*
सर्व Quora सदस्यांना सस्नेह नमस्कार🙏🙏
Quora व्यासपीठावर अनेक सदस्य हे सध्या अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया असे परदेशात वास्तव्य करीत असुन त्यांचे मराठी संस्कृती, पौराणिक वांड्मय, संत वांड्मय याबद्दलची आत्मीयता आणि तळमळ त्यांच्या लेखनातून दिसुन येते.
Quora व्यासपीठावर नित्यनियमाने योगदान देणारे श्री शशिकांत पानट साहेब हे सध्या अमेरिकेत वास्तव्य करीत आहे. रामायणावर बरेच काव्य, पद्द वांड्मय, तसेच गदिमा यांचे गीत रामायण आणि त्याला स्व. सुधीर फडके (बापुजी) यांचा स्वर यामुळे तर कळसच गाठला. श्री शशिकांत पानट हे या कलाकृतीने भारावून गेले. आपण महाभारताबद्दल पण असे काही तरी अद्भुत कार्य करावे, म्हणून लॉस एंजेलस ( अमेरिका) येथे वास्तव्य करीत असतांनाच वयाच्या ८२ व्या वर्षी "गीत महाभारत" ही काव्य कलाकृती यु ट्युब वर त्यांच्या "Euphoriart Official" प्रसारीत केली आहे.
सदर "गीत महाभारत" या काव्य कलाकृतीचे उदघाटन स्वर सम्राज्ञी स्वर्गीय भारतरत्न लता मंगेशकर यांनी २००७ केले. त्यांच्या ही कलाकृती गायक सुरेश वाडकर, केतकी माटेगावकर, जितेंद्र अभिषेकी, ऋषीकेश रानडे अशा अनेक दिगग्ज गायकांनी स्वरबद्ध केले आहे.
Quora व्यासपीठावर सर्व सदस्यांना या कलाकृतीचा आनंद घेता यावा म्हणून वानगी दाखल वरती एक चित्रफित टाकली आहे…
आपणा सर्वांना पण श्री शशिकांत पानट साहेबांची ही कलाकृती नक्कीच आवडेल असा आत्मविश्वास आहे… धन्यवाद🙏🙏
एक अप्रतिम अदभुत संकल्पना आणि उपक्रम
ReplyDelete