✨ घट्ट नात्याचं घर...🏚️

 हा सुंदर आणि विलोभनीय फोटो खूप काही सांगुन जाणारा आहे. फोटो काळापांढरा आहे . पण या घरातील सुख समाधान व एकजुटीचे सारे रंग दाखवणारा आहे. यात कोणतरी प्रतिकात्मक आबा आहे. त्याने डोळे वटारले की घर शांत. कोण तात्या आहे. जो चार चार बैलांचा औत जुपायचा. कोण बापू आहे . जो दोन दोन भाकरी वरण्याच्या आमटीत कुस्करून खायचा. कोण शांताक्का आहे. .पन्नास पोळ्या पटाटा लाटायची. कोण बनाकाकू आहे. चटणी घरात कांडायची.

कोण कुसुम आहे. उभ्या आडव्या २१ ठिपक्याची रांगोळी काढायची. एक पिंट्या आहे. हरणी गाय आहे. घर साधं आहे. पण नात्याच्या एकोप्याचा पाया भक्कम आहे. आपली, आपल्या आजोबा पणजोबांची घरं अशीच होती . आता पोरांना काका माहित नाही. आत्या माहित नाही. ज्या घरात नणंद नाही, दिर नाही, खोकणारा सासरा नाही , गुडघे दुखतात म्हणून कन्हणारी सासु नाही अशा घराला नववधुची पसंती आहे. त्यामुळे अशी भरलेली घरं आता दिसणारच नाहीत. आणि असा सर्वांचा एकत्र फोटोही शक्य नाही..

पञकार :सुधाकर काशीद.

Comments

Popular posts from this blog

पिंगळा महाद्वारीं बोली बोलतो देखा

*सहानुभूती एवढीच अपेक्षा