"वेदांनाही नाही कळला अंतपार याचा"

 "वेदांनाही नाही कळला अंतपार याचा" हे महाकवी ग.दि.माडगूळकरांनी यांनी त्यांच्या शब्दात पंढरीच्या त्या "सावळे सुंदर रूप मनोहर" अशा विठ्ठलाचे त्यांच्या अलंकारीक पद्य पंक्तीत वर्णन केले आहे. त्याला ते "कानडा राजा पंढरीचा" अशा शब्दात पण वर्णन करीत आहे.

हा विठ्ठल "कानडा राजा" का बरे ?

थोडक्यात आपण ती भूमिका पण समजून घेऊ, म्हणजे मुळ प्रश्नाचे अजून व्यवस्थित स्पष्टीकरण होईल. विठ्ठलाला उत्तर कर्नाटाकतील बरेच भक्त "विठ्ठल हा कर्नाटाकु आहे" तो "कानडा राजा" असे मानतात. कानडा म्हणजे समजण्यासाठी अवघड, कानडा म्हणजे गुढ, गम्य, कानडा म्हणजे ज्याची भाषा अवघड आहे, कानडा म्हणजे ज्याचा रहिवास कर्नाटक राज्यात आहे.

कर्नाटाकात हंपी येथे विठ्ठल मंदिर आहे. त्यामुळे पण विठ्ठलाला "कानडा" असे बिरुद लागले असणार. तेथील "संत पुरंदरदास" यांनी पण विठ्ठल भक्तीवर काव्य केले आहे. ते शेवटी "विठ्ठल पुरंदरदास" असा उल्लेख करतात. त्यामुळे आपल्याला "कानडा" हा विठ्ठलाला वापरलेला शब्द जागोजागी दिसतो. विठ्ठल दैवत हे कर्नाटकातून आले की काय असे पण बऱ्याच जणांना वाटत असेल.

गदिमा सुध्दा वरील शब्दांनी विचलित झाले आहे. त्यांचे म्हणने, "बाबारे विठ्ठला मी तुला समजुन घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे, पण तुझे रूप, माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे.

तु मला समजणार तरी कसा, कारण तु निर्गुण निराकार आहे. कंबरेवर हात ठेवलेले सावळे सुंदर मनोहर रूप तर घेतलेच, त्याशिवाय वेळोवेळी आपल्या भक्तांच्या जीवनात विविध रूपे घेऊन तो कसा सामील झाला याचा त्या भक्तांना पण थांग पत्ता लागु दिला नाही. याच आशयाने आपल्या गीतामध्ये गदिमांनी उल्लेख केला आहे.


वेदांनाही नाही कळला अंतपार याचा।कानडा राजा पंढरीचा।।

निराकार तो निर्गुण ईश्वर। कसा प्रकटला असा विटेवर।

उभय ठेविले हांत कटीवर। पुतळा चैतन्याचा।।१।।

कानडा राजा

या विठ्ठलाला समजणे फार अवघड आहे. त्याचे वर्णन कसे करू आणि कीती करू.

त्याची सगुण आणि निर्गुण अशी दोन्ही रूपे विलक्षण आहे. त्याच्या दिव्य तेजाने डोळे दिपतात, त्याचे अवर्णनीय लावण्य पाहून मन मुग्ध होते. अवाक् झाल्यामुळे बोलायला शब्द सांपडत नाहीत, पण मनोमनी संवाद होतो. त्याच्या दर्शनाने दिग्मूढ होऊन कांही कळेनासे झाले. पाया पडायला गेले तर पाऊल सांपडेना इतकेच नव्हे तर त्याचे अमूर्त रूप आंपल्याकडे पाहते आहे की पाठमोरे उभे आहे ते सुध्दा समजत नाही. त्याला भेटण्यासाठी दोन्ही हांतानी कवटाळले पण मिठीत कांहीच आले नाही. असा हा 'कानडा हो विठ्ठलू' आहे. चर्मचक्षूंना तो उमगत नाही पण मनःचक्षूंना त्याची खूण पटते, शरीरातील इंद्रियांकरवी तो जाणता आला नाही पण हृदयाने त्याचा रसपूर्ण अनुभव घेतला.

हा विठ्ठल काय काय करतो, हे मी तुम्हाला कोणत्या शब्दात सांगु;

परब्रम्ह हे भक्तांसाठी। मुके ठाकले भीमेकांठी।

उभा राहिला भाव सावयव। जणु की पुंडलिकाचा ।।२।।

हा नाम्याची खीर चाखतो। चोखोबाची गुरे राखतो।

पुरंदराचा हा परमात्मा। वाली दामाजीचा।।३।।

त्यामुळेच आपल्या काव्य पंक्तीतुन गदिमा यांनी त्यांचे वर्णन केले, की हा विठ्ठल कसा आहे,

वेदांनाही नाही कळला अंतपार याचा।कानडा राजा पंढरीचा।।

हा विठ्ठल कोणाचे रूप आहे ;

"ज्ञानियाचा वा तुक्याचा तोचि माझा वंश आहे।"

याची पण उकल होत नाही. असे गदिमा वर्णन करीत आहे.

।।जय जय राम कृष्ण हरी ।।

स्रोत :-

कानडा राजा पंढरीचा | Kanada Raja Pandharicha |

कानडा राजा

Comments

Popular posts from this blog

पिंगळा महाद्वारीं बोली बोलतो देखा

*सहानुभूती एवढीच अपेक्षा